Monday 29 January 2018

मत्रालयात विश प्राशन केलेले धर्मा पाटील कोण होते आणि त्यांनी आत्महत्या का केली?

धर्मा पाटील कोण होते.
धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शेतकरी होते. धुळे जिल्ह्यात होऊ घातलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. असे असले तरी त्यांना मात्र पाच एकराच्या बदल्यात फक्त चार लाख रुपये इतकीच भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्याकडे चार एकर जमीन होती. या जमिनीत आंब्याची ६०० झाडे होती. शिवाय विहीर, ठिबक सिंचन आणि वीजेचीही उत्तम व्यवस्था होती..

आत्महत्या का केली?
इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत आपल्याला भरपाई कमी मिळाल्याचे धर्मा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून आपली लढाई सुरू केली. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळाले नाही. याचा निषेध म्हणून पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विषप्राशन केरून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर सरकारने पाटील यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांचे सामुग्रह अनुदान देऊ केले. सरकारचे हे अनुदान पाटील कुटुंबीयांनी नाकारले. आम्हाला अनुदान नको, तर मोबदला हवा अशी स्पष्ट मागणी पाटील कुटुंबीयांनी सरकारकडे केली होती.